Posts

थायरॉइडचा आजार कायमस्वरूपी बरा करणे आता शक्य     गेल्या दशकात आपल्या देशात थायरॉइडचा रुग्णांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे.जवळपास 30% भारतीयांना थायरॉइडच्या आजाराची लक्षणे दिसून येतात. थायरॉईडच्या आजारामध्ये थायरॉक्झीन या हार्मोनचे प्रमाण कमी किंवा जास्त होते,त्यानुसार या आजाराचे दोन प्रकार आहेत. म्हणजेच हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम. या दोन प्रकारातील सर्वात मोठा फरक म्हणजे हायपोथायरॉईड हायपोथायरॉईडीझम असलेल्या रुग्णांचे वजन वाढते आणि  हायपरथायरॉईडीझम च्या रुग्णांचे वजन कमी होते.       रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो तो हायपोथायरॉईडीझम या आजाराची लक्षणे पुढील प्रमाणे असतात - वजन वाढणे,थकवा जाणवणे, चिडचिडेपणा वाढणे, झोप जास्त येणे,अंगात जडपण जाणवणे, त्वचा कोरडी पडणे, शरीरावर तसेच तोंडावर सूज येणे, हातापायाला बधिरता जाणवणे,थंड हवा थंड वातावरण सहन न होणे, बद्धकोष्ट (पोट साफ न होणे), मांसपेशी मध्ये  वात येणे,पोटाचे विकार,डोकेदुखी होणे,डिप्रेशन जाणवणे.                  हायपरथायरॉईडीझम या आजाराची लक्षणे पुढीलप्रमाणे असतात - कारण नसताना अचानक वजन कमी होणे, गर्मी सहन न